पनवेल येथील फर्निचरच्या दुकानाला आग

। पनवेल । प्रतिनिधी ।

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी पनवेल टेंभुरड़े येथील फर्निचरच्या दुकानाला पहाटे साडेपाचच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. दुकानात लाकडी वस्तू असल्याने आग वाढतच गेली. आगीची बातमी समजताच नवीन पनवेल सिडको अग्निशामक दलाने घटनास्थळी जावून आगीवार निंयत्रण मिळवले. ही आग पुर्णपणे विझवेपर्यंत फर्निचरचे दुकान जळून खाक झाले. तसेच, बाजुलाच असलेले चायनिजचे दुकानही जळून खाक झाले आहे. या आगीचे कारण अद्‌यापही अस्पष्ट आहे.

Exit mobile version