म्हसळा | वार्ताहर |
म्हसळा शहरांतील नागरी वस्तीतील मातोश्री पार्क, निता रेसीडन्सी आणि चोचे बिल्डींचे पार्कींगमधील एक कार आणि पाच मोटर सायकल जाळण्याचा प्रकार रविवार (दि 14) मे रोजी सायं 5 ते 6 च्या सुमारास घडला असल्याचे सांगितले. शिरीष समेळ यांची मारूती सुझीकी एक्स्प्रेस आणि कार क्रं एम.एच 06 बी.यु. 7948, चोचे बिल्डींग साळीवाडा येथे हीरो मोटर सायकल क्र एम.एच 29 बी.एक्स 3528 3) सुझीकी एक्स्प्रेस मोटर सायकल क्र एम.एच 06 सी.एच 1841, 4 ) ज्युपीटर मोटर सायकल क्र एम.एच 06 सी.बी.7330 यामध्ये मातोश्री पार्क मधील एका भाडोत्र्याची एक मोटरसायकल पेटविली. या सर्व वाहनांचे जळून सुमारे एक लक्ष 55 हजार नुकसान झाल्याचे पोलीस सूत्रानी सांगितले.