अणुस्कुरा घाटात दरड कोसळली

घाटमार्गातील वाहतूक ठप्प

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

रत्नागिरी-राजापूर जवळच्या अणुस्कुरा घाटात शनिवारी (दि. 24) पहाटे 5च्या सुमारास दरड कोसळली. त्यामुळे कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली असून वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा अणुस्कुरा घाट महत्वाचा असून तो जलद वाहतुकीसाठी वापरला जातो. या घाटमुळे प्रवासाच्या वेळेबरोबरच इंधानाचीही बचत होते. मात्र, संततधार पावसामुळे शनिवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. मातीच्या ढिगार्‍यासह मोठमोठे दगड रस्त्यामध्ये आले. त्यामुळे बांधकाम विभागाच्या माध्यमातून जेसीबीद्वारे रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्याचे काम सुरू आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान यंदाच्या पावसाळ्यामध्ये अणुस्कुरा घाटात तिसऱ्यांदा दरड कोसळली. यामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version