सुधागड तालुक्यात दरड कोसळली

| सुधागड-पाली | वार्ताहर |

सुधागड तालुक्यातील वावळोली गावात शनिवारी (दि.22) दरड कोसळली. सुदैवाने येथे कोणतीही आर्थिक व जिवीतहानी झाली नाही. भविष्यात याठिकाणी मोठी दुर्घटना घडू नये यासाठी शासनाने योग्य उपाययोजना करण्याची मागणी येथील उपसरपंच शरद किंजावडे, ग्रामपंचायत सदस्य संजय फाळे व ग्रामस्थांनी केली.

वावळोली गावाच्या उत्तर दिशेला लागून असलेल्या डोंगराची दरड कोसळली आहे. या ठिकाणी काही अंतरावरच ग्रामस्थांची घरे आहेत. या घरांपर्यंत माती आली होती. यामुळे घरातील मंडळी व ग्रामस्थ घाबरले आहेत. माध्यमांना माहिती देतांना शिरीष सकपाळ, पोलीस पाटील सुधीर महाले, गणेश महाले, दिनेश महाले, रघुनाथ वालेकर व ईश्वर हिलम आदी उपस्थित होते.

ताबडतोब ग्रामस्थ व पोलीस पाटील यांच्यासह दरडग्रस्त व डोंगर भागाची पाहणी केली. भविष्यात या ठिकाणी कोणतीही आपत्ती ओढवून जीवित व वित्तहानी होऊ नये यासाठी शासनाच्या माध्यमातून उपाययोजना करण्यात याव्यात व संभाव्य धोका टाळण्यात यावा.

शरद किंजावडे, उपसरपंच, ग्रुप ग्रामपंचायत सिद्धेश्वर

गावावर दरड कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने या बाबीची गंभीर दखल घेऊन लागलीच योग्य उपाय करावेत व संभाव्य धोका टाळावा.

संजय फाळे, ग्रामस्थ वावळोली
Exit mobile version