कासा बाजारपेठेत चोरट्यांचा धुमाकूळ

। पालघर । प्रतिनिधी ।

डहाणू तालुक्यातील कासा बाजारपेठेत सोमवारी (दि.9) मध्यरात्री चोरट्यांनी पाच दुकाने फोडून दहा ते बारा हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे. श्रद्धा कॅफे, मुलतानी ट्रेडर्स, फर्निचर आणि राजलक्ष्मी स्पेअर पार्टसह व अन्य दुकानांमध्ये हा चोरीचा प्रकार घडला आहे. चोरीचा हा प्रकार बाजारपेठेत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे 4.17 वाजता सफेद कपडे घातलेला, चेहर्‍यावर कपडा आणि चष्मा लावलेला चोरटा दुकानांमध्ये शिरताना दिसत आहे. विशेष म्हणजे, चोरट्यांनी काठीच्या साहाय्याने सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या वायरी तोडून त्यांना निकामी केले. एका दुकानात पुढे कॅमेरा असल्याने मागील दरवाजाचा उपयोग करून प्रवेश करण्यात आला. चोरी दरम्यान फक्त गल्ल्यातील रोकड लंपास केली असून कोणत्याही वस्तूची चोरी झालेली नाही. या घटनेमुळे व्यापार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. व्यापार्‍यांनी संशय व्यक्त केला आहे की हे चोर व्यसनाधीन असू शकतात. त्यांनी पोलिसांकडे त्वरित कारवाईची मागणी केली आहे.

Exit mobile version