ओवळे गावात चोरांचा धुमाकूळ

चार घरात प्रवेश करुन लाखोंचा माल लंपास

। उरण । वार्ताहर ।

उरण, पनवेल तालुक्यात दिवसेंदिवस गुन्ह्यांचे प्रमाण वाढतच चालले आहे. ओवळे गावात चोरट्यांनी एकाच रात्रीत चार घरात घुसून चोरी करत लाखो रुपयांचा माल लंपास केला आहे.

उरण, पनवेल तालुक्यात या अगोदर चोरीच्या घटनेत वाढ झाली होती. मात्र पोलीसांच्या तपास यंत्रणेमुळे काही अंशी सदर घटनेला लगाम बसला होता. मात्र सध्या पावसाचा जोर आणि त्यात सातत्याने होणारा खंडित विद्युत पुरवठा यांचा फायदा संध्या भुरट्या चोरांनी उठविला आहे. त्यातच नुकताच ओवळे गावात चोरट्यांनी धुमाकूळ घालत रहिवाशांच्या बंद घरातील दरवाजाच्या कँडी, लाँक तोडून घरात प्रवेश करुन कपाटातील, इतर ठिकाणावर ठेवलेले पैसे, मौल्यवान वस्तू घेऊन पोबारा केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची पोलीसांना खबर देण्यात आली असून याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Exit mobile version