चेंढरेमध्ये शिंदे गटाला भगदाड

चिमणे यांचा शेकापमध्ये प्रवेश

अलिबाग । प्रतिनिधी ।

चेंढरे ग्रामपंचायतीच्या माजी सदस्य अ‍ॅड. रेखा चिमणे आणि अनिल चिमणे यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा शेतकरी भवन येथे बुधवारी (दि.6) छोटेखानी कार्यक्रमात पार पडला. चिमणे यांच्या पक्षप्रवेशामुळे चेंढरेमध्ये शिंदे गटाला भगदाड पडले आहे. ऐन निवडणुकीत शिंदे गटातील कार्यकर्ते शेकापमध्ये प्रवेश करू लागल्याने त्याचा फटका महेंद्र दळवी यांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अनिल चिमणे आणि रेखा चिमणे हे गेल्या अनेक महिन्यांपासून शिंदे गटातील शिवसेनेमध्ये कार्यरत होते. शिंदे गटाच्या मनमानी कारभाराला कंटाळून त्यांनी सोमवारी शेकापच्या कार्यप्रणालीवर खुश होऊन शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश केला. नवनिर्वाचित कार्यकर्त्यांचे जयंत पाटील यांनी जल्लोषात स्वागत केले.
यावेळी अ‍ॅड. परेश देशमुख, दत्ता ढवळे, ममता मानकर, प्रशांत फुलगावकर, दिनेश कवाडे, राम थळे, संजय घरत, नाना घरत, दिलीप मानकर, संदीप ढवळे, विलास म्हात्रे, नागेश वंजारे, मिथुन बेलोसकर, शरद कापसे, लक्ष्मण पवार, विरेंद्र साळवी, एस.एम. पाटील, अतुल जाधव, नरेश भैरी, मोनिष आचार्य, गणेश कुमार, संतोष जंगटी, सदीम आसम आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या.

Exit mobile version