महावितरणतर्फे सेवा पंधरवडा सार्थकी; 58 हजारावर नवीन वीजजोडण्या

| मुंबई | प्रतिनिधी |

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यात महावितरणने विशेष कामगिरी बजावत केवळ 15 दिवसांत 58 हजार 457 घरगुती ग्राहकांना नवीन वीजजोडण्या दिल्या आहेत. याशिवाय प्रलंबित असलेल्या 44 हजार 669 ग्राहकांच्या वीजबिलावरील नावात बदल करण्याचे सर्व अर्ज निकाली काढत राज्य शासनाच्या या उपक्रमाचे महावितरणने 100 टक्के उद्दीष्ट साध्य केले आहे.

पंधरवड्यात ग्राहकांच्या प्रलंबित असलेल्या विशेषत: नवीन वीजजोडणी व ग्राहकांच्या वीजबिलावरील नावात बदल करणे या प्रकारच्या तक्रारींचे निवारण या पंधरवड्यात करण्यात यावे असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी दिले होते. महावितरणने नवीन वीजजोडणीसोबतच ग्राहकांच्या वीजबिलावरीलनावात बदल करण्याची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. नवीन ग्राहकांना वीजजोडणीसाठी रहिवाशी असल्याच्या एखाद्या दाखल्यासोबत सुरक्षा ठेव रक्कम भरावी लागते. तसेच वीजबिलावरील नावात बदल करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था किंवा सक्षम अधिकार्‍यांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

क्षेत्रीय स्तरावर दि. 10.09.2022 पर्यन्त पैशाचा भरणा करून प्रलंबित असलेल्या 58 हजार 457 नवीन घरगुती वीजजोडणीच्या अर्जावर त्वरित कार्यवाही करून सेवा पंधरवाड्यात सर्व ग्राहकांना नवीन वीजजोडण्या देऊन 100 टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे.घरगुती ग्राहकांना वीजजोडण्या देण्यात आलेल्या अर्जाची प्रादेशिकनिहाय संख्या पुढीलप्रमाणे असून यात औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत 9 हजार 528, कोंकण प्रादेशिक कार्यालयांतर्गत 25 हजार 685, नागपूर प्रादेशिक कार्यालयांतर्गत 14 हजार 975 आणि पुणे प्रादेशिक कार्यालयांतर्गत 9 हजार 673 नवीन घरगुती वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. यात कल्याण परिमंडलातील 6 हजार 686 नवीन वीजजोडण्याचा समावेश आहे.

याशिवाय ग्राहकांच्या वीजबिलावरील नावात बदल करण्यासाठी 44 हजार 669 ग्राहकांचे अर्ज वैध ठरविण्यात आले असून या सर्व ग्राहकांच्या नावात बदल करण्यात आले आहे. ग्राहकांच्या वीजबिलावरील नावात बदल करण्यात आलेल्या अर्जाची प्रादेशिकनिहाय संख्या पुढीलप्रमाणे असून यात औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत 3 हजार 285, कोंकण प्रादेशिक कार्यालयांतर्गत 20 हजार 283, नागपूर प्रादेशिक कार्यालयांतर्गत 6 हजार 300 आणि पुणे प्रादेशिक कार्यालयांतर्गत 14 हजार 801 ग्राहकांचा समावेश आहे. यात कल्याण परिमंडलातील 5 हजार 711 अर्जांचा समावेश आहे.

Exit mobile version