| अमरावती | वृत्तसंस्था |
बाॅयफ्रेंडच्या वादातून एका तरुणीने मैत्रिणीला चाकून भोसकून खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर अमरावती शहरात एकच खळबळ उडाली आहे. तो माझाच आहे तुझ्यामुळे दुरावा निर्माण झाला असा गैरसमज करून घेत अमरावती शहरातील एका तरुणीने आर्वीमधील युवतीला चाकूने भोसकले. ही भयंकर घटना मंगळवारी (दि.8) रात्री साडेआठच्या सुमारास दस्तूरनगर सुपर एक्सप्रेस हायवेवर घडली. मैत्रीण रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर तरुण आणि तिचा मित्र फरार झाले आहेत. पोलिलांनी दिलेल्या माहितीनुसार शुभांगी (26 ) आर्वी, वर्धा असे मृत तरुणीचे नाव आहे.