पाण्यात काढलेली रांगोळी आकर्षक ठरली; 42 विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धेत सहभागी
| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड समुद्रकिनाऱ्यापासून तीन किलोमीटर अंतरावर अरबी समुद्रात राजे शिवछत्रपती महाराजा व शंभुराजे आणि जिगरबाज मावळ्यांनी पद्मदुर्ग किल्ल्याची निर्मिती केली होती. आज 350 वर्ष पूर्ण होत असून, यानिमित्त मुरूड येथील पद्मदुर्ग शौर्यगाथा ऐतिहासिक संमेलन शिवप्रेमी मंच यांनी पद्मदुर्ग किल्ल्यात शौर्यगाथा ऐतिहासिक संमेलन आयोजन करण्यात आले होते. ऐतिहासिक संमेलन शेकडो शिवप्रेमीच्या उपस्थित संपन्न झाला.
यावेळी इतिहास अभ्यासक आप्पासाहेब परब, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज विक्रमसिंह मोहिते, पद्मदुर्ग आरमार अधिकारी लायजी सरपाटील यांचे वंशज निलेश सरपाटील, शिवाजी स्मारक मंडळाचे कार्यावाह सुधीर थोरात, प्रवेश पालशेतकर, अनिकेत पाटील, अतुल मोरे, पंकज भोसले, सिध्देश पुलेकर, अश्विन विरकुड, विरेंद्र गायकर, श्वेता पालशेतकर, गौतमी पानवलकर आदिंसह महिलांसह शिवप्रेमी, शालेय व महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी ओंकार शाळा, मुरूड नगरपरिषद शाळा व सर एस ए हायस्कूलच्या 42 विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेत सहभागी नोंदवून पद्मदुर्ग किल्ल्याचे चित्र काढुन शिवरायांना मानवंदना देण्यात आली.
चित्रकार महेंद्र पाटील यांनी श्री शिवछत्रपतींची पाण्यात काढलेली रांगोळी विशेष आकर्षण ठरली. इतिहास अभ्यासक अनिकेत पाटील यांनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना गडाची व आतील वास्तुंची माहिती सांगण्यात आली. पद्मदुर्गाचे ऐतिहासिक महत्व व इतिहास सर्वसामान्य पर्यटकांपर्यंत पोहोचवणे तसेच सामान्य नागरिकांनी पद्मदुर्गचा इतिहास सांगून पोहोचवून रोजगार निर्मितीव्हावी याकरिता गाईड प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. अशी माहिती अनिकेत पाटील यांनी दिली. इतिहास तपस्वी आप्पा परब यांनी भारताच्या वैभवशाली इतिहास, परकीय आक्रमण आणि राजे शिवछत्रपती महाराजांचा विजयी पराक्रमाचा इतिहास सांगण्यात आला.
दुर्गसंवर्धक आणि इतिहास विषयात मौल्यवान कामगिरी करणाऱ्या शिवप्रेमी आणि संस्थांचा सत्कार आप्पा परब, पंकज भोसले, सुधीर थोरात, विक्रम सिंह मोहिते व निलेश सरपाटील यांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. आरमार अधिकारी लायजी सरपाटील यांचे वंशज निलेश सरपाटील यांनी लायजी पाटील यांनी जंजिरा स्वराज्यात येण्यासाठी केलेल्या कामगिरीची आठवण करून देत कार्यक्रमाची शोभा वाढवली. विक्रम सिंह मोहिते यांनी इतिहासातील आरामाराचे महत्व या विषयावर मार्गदर्शन केले. सदर कार्यकर्मात सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज विक्रमसिंह मोहिते, पद्मदुर्गचे आरामार अधिकारी लायजी सरपाटील यांचे वंशज निलेश सरपाटील तसेच अप्पासाहेब परब यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. अखेर महाराष्ट्र गीताने कार्यकर्माची सांगता करण्यात आली.
शिवशाही अवतरली
शिवप्रेमींनी गडाला फुलांच्या माळांनी व भगव्या सजवले होते. जशी शिवशाही अवतरली होती. यावेळी प्रथम श्री कोटेश्वरी देवीची पुजा श्वेता पालशेतकर व विविध महिलांच्या हस्ते देवीची ओटी भरुन पुजा करण्यात आली. तद्नंतर पद्मदुर्ग उभारणीच्या वेळी उभारण्यात आलेल्या मुहर्त मेढीच्या खांबाला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.






