जडेजाला ‘त्रिशतकाची’ सुवर्णसंधी

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

भारतीय संघचा अनुभवी डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात मोठा विक्रम करू शकतो. 35 वर्षीय अष्टपैलू रवींद्र जडेजा कसोटी क्रिकेटमध्ये अनोखे त्रिशतक झळकावण्याच्याजवळ आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना 7 मार्चपासून धर्मशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

सध्याच्या कसोटी मालिकेत भारताने इंग्लंडविरुद्ध 3-1 अशी अभेद्य आघाडी कायम ठेवली आहे. भारताने याआधीच कसोटी मालिका जिंकली आहे. या मालिकेत रवींद्र जडेजा कसोटी क्रिकेटमध्ये मोठे यश मिळविण्याच्या अगदी जवळ आहे. रवींद्र जडेजाने आतापर्यंत भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये 71 कसोटी सामन्यांमध्ये 292 विकेट घेतल्या आहेत. धर्मशाला येथे इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात रवींद्र जडेजाने 8 विकेट्स घेतल्यास तो इतिहास घडवेल. रवींद्र जडेजा कसोटी क्रिकेटमध्ये 300 विकेट्स पूर्ण करणार आहे. जडेजाने सध्याच्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील 3 सामन्यांत 17 विकेट्स घेतल्या आहेत.

Exit mobile version