माणगावातील तरुणांना सुवर्णसंधी; नर्सिंग ट्रेनिंग सेंटर सुरु

| म्हसळा | वार्ताहर |

अ‍ॅड. राजीव साबळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माणगाव नर्सिंग ट्रेंनिंग सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी भूपेंद्र जगताप, रिना चव्हाण, अमोल म्हात्रे, रोशन नाईक, दिक्षित मेस्त्री, अंकिता मोरे आणि डॉ. अजय मोरे हे उपस्थित होते. माणगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी मुंबई येथील मैत्री फाऊंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष व मेडिकल ऑफिसर संजय पाटील यांच्या माध्यमातून रायगड इन्स्टिट्यूट ऑफ आय.टी. माणगाव येथे माणगाव नर्सिंग ट्रेनिंग इन्स्टिटयूट या ट्रेनिंग सेंटर मध्ये ए. एन. एम.(1वर्षे) व जि. एन. एम. (3 वर्षे) चे बेसिक व डीग्री कोर्स सुरु करण्यात आले आहे.

सदर कोर्स सरकारमान्य असून, महाराष्ट्र नर्सिंग कॉन्सील येथे रजिस्ट्रेशन आहे. कोर्सेससाठी बाहेरगावातील मुला/मुलींची राहण्याची व खाण्याची सुविधा असून, स्कॉलरशिप व एज्युकेशन लोन सुविधा उपलध असल्याचे डॉ. विजय मोरे यांनी सांगितले. कोर्सेस पूर्ण झाल्यानंतर नामांकित सरकारी व खासगी स्थानिक तसेच मुंबई व पुणे येथील हॉस्पीलमध्ये इन्टरशिपची व्यवस्था केली जाईल. तरी, गरजूंनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले असून, प्रवेशासाठी आय. टी. इन्स्टिट्यूट, एस.टी.स्टॅन्ड समोर, प्रणव प्लाझा, दुसरा मजला, 204/5 माणगाव-रायगड येथे संपर्क साधावा.

Exit mobile version