31,700 रुपयांचा मुद्देमाल चोरीस
| रसायनी | प्रतिनिधी |
रसायनी पोलीस ठाणे हद्दीतील चावंढोली गावात 17 जानेवारी रोजी पहाटे अज्ञात चोरट्यांनी किराणा दुकान फोडल्याची घटना घडली. श्रीराम किराणा सुपर मार्केटच्या छतावरील सिमेंटचा पत्रा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. दुकानातील रोख रक्कम व इतर मुद्देमाल असा एकूण 31 हजार 700 रुपयांचा माल चोरून नेण्यात आला. सकाळी दुकान उघडण्यास आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.







