बंद घरातून बंदूक लंपास

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबाग तालुक्यातील बोरीस गुंजीस येथील बंद घरातून बंदूक आणि काडतूस लंपास करण्यात आले आहेत. स्वयंपाक खोलीमधील खिडकीतून घरात घुसून चोरट्यांन हा प्रकार केला आहे. ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील कनकेश्‍वर फाट्यापासून काही अंतरावर बोरीस गुंजीस येथे स्वप्नपुर्ती नावाचे घर आहे. 28 एप्रिल ते 2 मे या कालावधीत चोरट्याने स्वयंपाक खोलीतील खिडकीची लोखंडी ग्रील उपकून घरात प्रवेश केला. त्यानंर हॉलमधील लोखंडी कपाटात असलेली 60 हजार रुपये किंमतीची 32 बोअरची बंदूक, 1 हजार रुपये किंमतीचे पाच विदेशी काडतूसे व 400 रुपये किंमतीचे भारतीय कंपनीचे आठ काडतूस असा एकूण 61 हजार 400 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.

Exit mobile version