फरार आरोपीकडे सापडली बंदूक

रेवदंडा पोलीसांची कारवाई


|अलिबाग | प्रतिनिधी |

फरार असलेल्या आरोपीचा शोध घेत असताना त्याच्याकडेच गावठी ठासणीची बंदूक महालुंगे येथील आदिवासीवाडीमधील त्याच्या घरी गुरुवारी सापडली. रेवदंडा पोलिसांनी त्याच्यासह दहा हजारहून अधिक किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार नंदगावे अधिक तपास करीत आहेत.

महेंद्र पवार असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडे यापुर्वीदेखील बंदूक सापडली होती. ती बंदूक एका तरुणीवर हल्ला करण्याच्या उद्देशाने वापरल्याने त्याच्याविरेोधात 2015 मध्ये रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

तो फरार होता. त्यामुळे अलिबागमधील जिल्हा सत्र न्यायालयाने त्याच्याविरोधात अटक वॉरंट काढला होता. या फरार आरोपीचा पोलीस शोध घेत होते. तो महालुंगे येथील आदिवासीमधील घरी असून त्याच्याकडे ठासणीची बंदूक असल्याची माहिती पोलीस हवालदार तुषार पारवे यांना मिळाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार नंदगावे, पोलीस हवालदार मनिष ठाकूर, तुषार पारवे, महेंद्र राठोड, पोलीस नाईक सुग्रीव गव्हाणे, पोलीस नाईक सचिन वाघमारे, सिध्देश शिंदे, पोलीस शिपाई गणेश चोरगे, चालक पोलीस शिपाई जितेंद्र मगर यांचे पथक तयार करण्यात आले. या पथकाने गुरुवारी( दि. 1 ) फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास महालूंगे येथील आदिवासीवाडीमधील त्याच्या घरी छापा टाकला. या छाप्यात त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यावर त्याने लपून ठेवलेली ठासणीची बंदूक देखील जप्त केली. याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात असून त्याला अलिबाग येथील न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला 3 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Exit mobile version