बाबासाहेब पुरंदरे यांना मिळालेल्या पुरस्कारांची मांदियाळी

पुणे | प्रतिनिधी |
इतिहास पुत्र बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण (2019) डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाची डी.लिट. (2013), महाराष्ट्रभूषण पुरस्कार (19 ऑगस्ट 2015) – गार्डियन-गिरिप्रेमी जीवनगौरव पुरस्कार (2016), – प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार (2012), – राजमाता सुमित्राराजे भोसले यांनी दिलेली शिवशाहीर पदवी (1963) – त्रिदलचा पुण्यभूषण पुरस्कार – चतुरंग प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार – दादरा-नगर-हवेली मुक्तिसंग्रामातील कामाबद्दल स्वातंत्र्यसैनिक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

सांस्कृतिक क्षेत्रात पोकळी -मोदी
शब्दांमध्ये मांडता येणार नाही असं दु:ख मला झालं आहे. बाबासाहेब पुरंदरेच्या निधनामुळे इतिहास आणि संस्कृतिक क्षेत्रामध्ये कधीही न भरुन येणारी पोकळी निर्माण झालीय. त्यांच्या प्रयत्नांमुळेच भविष्यातील पिढ्या छत्रपती शिवाजी महारांजांशी जोडलेल्या राहतील. त्यांनी केलेलं इतर कामही कायमच स्मरणात राहील.

शिवआराधक गमावला -मुख्यमंत्री
पृथ्वीच्या पाठीवर शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही. अशा या अलौकिक शिवसाधकाने शिवरायांच्या स्तुतीसाठीच प्रयाण केले असावे.

शिवप्रभूंचा इतिहास जनतेसमोर ठेवला -पवार
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवछत्रपतींचा इतिहास जनतेसमोर ठेवला. मात्र, त्यात काही वादग्रस्त मुद्दे होते. त्या संदर्भात भाष्य करण्यास मी जाणकार नाही. त्या संदर्भातला मी तज्ज्ञ नाही. त्यांनी एक मोठी कामगिरी केली. शिवछत्रपतींच्या चरित्रासाठी आयुष्य खर्ची घातलं.

कौटुंबिक स्नेह जोपासला
बाबासाहेब पुरंदरे यांचे आम्हा सर्व मंगेशकर परिवारावर निस्सिम असं प्रेम होते.ते अखेरपर्यंत राहिले.तो कौटुंबिक स्नेह आम्ही दोन्ही परिवारांनी जोपासला. त्यांनी आपल्या अमोघ वाणीने शिवचरित्र मनामनात रुजविले.त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक शिवभक्त गमावला आहे.
लता मंगेशकर,गानसम्राज्ञी

Exit mobile version