| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारताचा सलामीवीर पृथ्वी शॉला दुखापतीतून सावरण्यासाठी अजून वेळ लागणार आहे. त्याला गुडघ्याच्या दुखापतीतून सावरण्यासाठी एक महिना लागू शकतो. त्यानंतरच पुनरागमन करताना दिसणार आहे. पृथ्वी शॉला गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये गुडघ्याच्या लिगामेंटला दुखापत झाली होती. पुढील तीन आठवड्यांत त्याला अधिक कामाचा ताण सहन करावा लागेल. आणि स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये सहभागी होण्याआधी त्याला काही स्थानिक खेळ खेळावे लागतील.
सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमी मध्ये पुनर्वसन करत असलेल्या पृथ्वी शॉने आपल्या फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात चांगली कामगिरी करत आहे. तथापि, त्याचे पुनरागमन ही गुडघाच्या दुखापतीवर अवलंबून असेल. असे मानले जाते की, पृथ्वी शॉ केवळ आयपीएल 2024 मध्येच पुनरागमन करू शकतो.