सुदृढ समाजाच्या निर्मितीसाठी शेकाप कटिबद्ध- चित्रलेखा पाटील

| रायगड | खास प्रतिनिधी |
प्रत्येक घरातील प्रत्येक स्त्रियांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतल्यास एक सुदृढ समाज निर्माण होईल.अशा सुदृढ समाजाच्या निर्मितीसाठी शेकाप नेहमीच कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन शेकापच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी केले.

शेकापची सामाजिक बांधिलकी पुन्हा एकदा समोर आली आहे. रोहा तालुक्यातील यशवंत खार येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी त्या बोलत होत्या. जेएसडब्ल्यू कंपनीच्या संजिवनी हॉस्पिटल आणि रोहा तालुका शेकाप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या आरोग्य शिबिराचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला. या प्रसंगी दिव्यांग महिलेला चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते तीन चाकी सायकल देण्यात आली.

यावेळी मार्गदर्शन करताना चित्रलेखा पाटील यांनी सांगितले कि, आजच्या शिबिरात लाभार्थी आले आहेत. त्यांना एखाद्या गंभीर आजार झाल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांचे ऑपरेशन मोफत करण्याची सुविधा करण्यात आली आहे. त्यामुळे कोणीही दुखणे अंगावर काढू नका. सुदृढ आरोग्यासाठी शेकाप तुमच्या सोबत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. शेकाप कार्यकर्त्यांची एकजूट अशीच कायम राहिल्यास समाजातील कोणत्याही प्रश्नाला आपण भिडू शकतो, असेही पाटील यांनी सांगितले.

धोंडकर, दापोली, करंजविरा, वावेपोटगे डोंगरी, झोलंबे, भातसई, लक्ष्मी नगर, कोपरा, सानेगाव बौद्धवाडी, यशवंत खार आदिवासी वाडी या परिसरातील नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. याप्रसंगी शेकापचेे जेष्ठ नेते शंकरराव म्हसकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नंदू शेठ म्हात्रे, रोहा पंचायत समितीचे माजी सभापती लक्ष्मण महाले, गणेश मढवी, गोपीनाथ गंभे, जितेंद्र जोशी, शंकर दिवकर, विकास तांडेल, संदेश विचारे, सुरेश कोतवाल, राम गिजे, अमोल थीलोरे उपस्थित होते.

जेएसडब्लूचे डॉ. अपूर्वा पाटील, डॉ.श्रद्धा पाटील, डॉ.सायली केणी, डॉ. सोनाली थळे, स्वाती मोकल, कृतिका वारगे, प्रितेश पाटील, विनीत पाटील, भूषण पाटील, अक्षय म्हात्रे यांनी लाभार्थ्यांची सर्व आजारांची तपासणी करून मोफत औषधे देण्यात आली.

मेढा उपकेंद्राचे डाॅ. विशाल भगत, आराेग्य सेविका एस.जी.पवार, आशा गट प्रवर्तक मंगल शेडगे, आशा स्वयंसेविका गणेशा माेरे, जयश्री पाटील, निलम दाभणे, निलीमा देशमुख, जान्हवी शेडगे, तन्वी वाघमारे, संगिता जाेशी,दिशा घरत यांची माेलाची मदत झाली.

जेएसडब्ल्यूच्या संजीवनी रुग्णालयाने शेकापच्या सामाजिक उपक्रमात नेहमीच मदत केली आहे. त्यांनी या पुढे देखील अशा उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन चित्रलेखा पाटील यांनी केले.

शेकाप हा गोरगरीब कष्टकऱ्यांचा पक्ष आहे. त्यामुळे शेकपने कधीच नुसते राजकारण केले नाही तर समाजकारण केले आहे. हीच सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी अशा आरोग्य शिबिराचे आयोजन शेकापच्या माध्यमातून सातत्याने करण्यात येत आहे. गोरगरिबांना याचा लाभ व्हावा, हाच या मागचा मूळ उद्देश आहे.

चित्रलेखा पाटील, शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख

मला ऐकू येत नाही. अलिबागला मोठ्या दवाखान्यात मी कधी जाणार?. आज शेकापने आरोग्य शिबिर भरवून आम्हा वयोवृद्धांना आमच्या दारातच आरोग्यसेवा मिळवून दिली आहे.

यमुबाई पाटील (वय 70)

शेकापने राजकारण कमी आणि समाजकारण अधिक केले आहे. आरोग्य शिबिर भरून आम्हाला आरोग्य सेवा दिल्याबद्दल आम्ही त्यांना धन्यवाद देतो.
महादू पाटील (वय 76)

महादू पाटील (वय

Exit mobile version