पूरग्रस्त व्यापार्‍यांना मदतीचा हात

| कोर्लई । वार्ताहर ।
मुरुड तालुक्यातील मजगाव येथील व्यापारी संघटना व प्रमोदशेठ यांच्या तर्फे महाड मधील पूरग्रस्त छोट्या व्यापारी वर्गाला एक लाख एक हजार रुपये मदत देण्यात आली.

मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे, पुराचे पाणी घुसल्याने महाड येथे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.याचा फटका व्यापारी वर्गाला बसला.
महाडमधील पूरग्रस्त छोट्या व्यापारी वर्गाला मदतीचा हात म्हणून मजगांव येथील व्यापारी संघटनेकडून 51000 रुपये तर प्रमोद(महाड ) यांच्या तर्फे 50000 रुपये मदत करण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष गजानन पाटील, उत्तम जैन,नरेंद्र जाधव, सुरेश जैन, अशोक जाधव, प्रमोद (महाड )निखिल मानाजी, संजय गोळे, इंद्रजित करंदीकर, गजानन कमाने, अरुण म्हशाळकर, वरुण भंडारी,महमद सिद्दी, किशोर आयरकर, स्वप्नील बिर्जे, चिन्मय गोयजी, संदीप कोटकर, चंद्रकांत पाटील किरण जयस्वाल व मजगाव मधील इतर छोटे व्यापारी यांनी केलेल्या मदतीचे कौतुक होत आहे.

Exit mobile version