सिडकोकडून इर्शाळवाडीला मदतीचा हात

अग्निशमन जवान, मजूर घटनास्थळी रवाना
| पनवेल | वार्ताहर |
इर्शाळवाडी येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर राज्यभरातून मदतीचा ओघ इर्शाळवाडीकडे वाहत असताना महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली सिडकोतर्फेदेखील दुर्घटनास्थळी सुरू असलेल्या मदतकार्यासाठी अग्निशमन जवान व 600 मजूर तातडीने पाठविण्यात आले आहेत.

दुर्घटनास्थळी सुरू असलेल्या मदतकार्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता आहे हे लक्षात घेऊन, मातीचे ढिगारे उपसण्यासाठी सिडकोकडून तातडीने 20 जुलै रोजी सकाळी 8 वाजता सिडकोच्या विविध गृहनिर्माण प्रकल्प स्थळांवरील 600 मजुरांचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यानंतर 21 जुलै रोजी पुन्हा 600 मजूर घटनास्थळी पाठविण्यात आले आहेत. तसेच बचाव कार्यासाठी सिडकोतील अग्निशमन जवानांची एक तुकडीही तातडीने इर्शाळगड येथे रवाना करण्यात आली आहे. बचाव कार्य सुरू असेपर्यंत सिडकोतर्फे ईर्शाळगड येथे मजूर पाठविण्यात येणार आहेत.

या प्रशिक्षित मनुष्यबळाबरोबच सिडकोतर्फे दुर्घटनाग्रस्त लोकांसाठी 25 स्ट्रेचर्स व पिण्याच्या पाण्याच्या पाच हजार (प्रत्येकी एक लीटर याप्रमाणे) बाटल्यादेखील पुरवण्यात आल्या आहेत. ईर्शाळगड येथील मदत कार्यासाठी योगदान देऊन, भौतिक व नगर विकासाबरोबरच सिडकोने सामाजिक बांधिलकीदेखील जोपासली आहे

Exit mobile version