बेनवले येथील कोरोनाबाधित ग्रामस्थांना मदतीचा हात


खरोशी | वार्ताहर |
राजकारण कमी आणि समाजकारण जास्त आशी ओळख असणारे जि.प. सदस्य प्रभाकर म्हात्रे (हरी ओम) यांनी पेण तालुक्यातील बेनवले येथे कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांच्या गावात जाऊन दररोज वापरण्यात येणार्‍या जीवनावश्यक भाजीपाल्याचे वाटप करण्यात आले.

पेण खारेपाट येथील बेनवले येथे कोरोना रुग्ण झपाट्याने वाढले असून, आत्तापर्यंत एका आठवड्यात 63 व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याने पेण तहसीलदार अरुणा जाधव यांनी बेनवले गाव लॉकडाऊन केला असून, गावातील नागरिकांना व बाहेरील नागरिकांना येण्यास व जाण्यास मनाई करण्यात आली. यामुळे गावातील कोरोना रुग्णांची जीवनावश्यक वस्तूची कमतरता भासू लागली होती; परंतु जि.प. सदस्य हरी ओम म्हात्रे यांनी नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासू नये म्हणून बेनवले गावात कोरोना रुग्णांसाठी भाजी, अंड्याचे वाटप करून समाजात आदर्श निर्माण केला. तसेच दिव गु्रप ग्रामपंचायतीकडून कोरोनाबाधित रुग्णांना गोळ्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी जि.प. सदस्य हरी ओम म्हात्रे, दिव सरपंच विवेक म्हात्रे, एकनाथ ठाकूर, भगवान मोकल, मेघनाथ मोकल, विजय ठाकूर तसेच आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version