। ठाणे । प्रतिनिधी ।
शहरातील घोडबंदर रोडवर आज सकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान भीषण अपघात झाला आहे. घोडबंदर येथील गायमुख घाटात अपघातामध्ये 14 वाहनांची एकमेकांना धडक बसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या अपघातात काही वाहनांचा अक्षरश: चुराडा झाला आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.
पथक दाखल झाल्यानंतर त्यांनी चार जणांना ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तर काही जण स्वत:हून वेगवेगळ्या रुग्णलयात दाखल झाले. त्यामुळे जखमी व्यक्तींची संख्या जास्त असण्याची शक्यता आहे. दरम्यान, या अपघतामुळे गायमुख घाट ते वसई खाडी पूलापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
घोडबंदरहून ठाण्याच्या दिशेने अवजड वाहन वाहतुक करत होते. त्याचवेळी काही हलकी वाहने या मार्गावरून विरुद्ध दिशेने वाहतुक करत होते. अचानक वाहनांचे नियंत्रण सुटल्याने ही वाहने एकमेकांना आदळली. अपघात ग्रस्त वाहनांमध्ये काही रिक्षा, चार चाकी वाहने, टेम्पो यासारख्या वाहनांचा सामावेश आहे. यातील काही वाहनांचा अक्षरश: चुराडा झाला आहे. घोडबंदर मार्गावरील या अपघातामुळे गायमुख ते वसई खाडी पूलापर्यंत वाहतुक कोंडी झालीआहे. अपघात ग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करण्याचे काम पथकांकडून सुरु आहे. रस्त्यावर वाहनांच्या काचा, वाहनांचे भाग रस्त्यावर तुटून पडले आहेत. त्यामुळे नागरिकांनी येथील प्रवास टाळावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.






