पेव्हर ब्लॉकवर घसरून घोड्याचा जागीच मृत्यू

। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरानमधील रस्ते सध्या क्ले पेव्हर ब्लॉकने बनविले असून त्या घोड्यावरून जात असलेल्या बाबू शिंगाडे यांच्या घोड्याचा पाय घसरून मृत्यू झाला. शिंगाडे यांचा घोडा पर्यटकाला घेऊन मार्केटमध्ये सोडण्यासाठी गेला होता. पर्यटकाला त्यांच्या इच्छितस्थळी सोडून घोडा पुन्हा दस्तुरी नाका येथे येत असताना महात्मा गांधी रस्त्यावर काळोखी भागातील उतरंडीवर घोड्याचा पाय घसरला आणि तो जमिनीवर कोसळला. मात्र त्या घोड्यावरील अश्‍वचालकाने सावध होत उडी मारल्याने त्याला मोठी दुखापत झाली नाही.

Exit mobile version