उमरोलीत दुकानाला भीषण आग

दुचाकीसह चार चाकी वाहन जळून खाक
। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील कर्जत-कल्याण राज्य मार्गालगत असलेल्या उमरोली येथील एका दुकानाला शुक्रवारी दीडच्या सुमारास आग लागली. या आगीत दुकान पूर्णतः जळून खाक झालं आहे. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, दुकानात चार चाकी वाहन व एक दुचाकी वाहन जळून खाक झाले आहे.
नेरळ कर्जत या राज्य मार्गावर येत असलेल्या उमरोली गावाजवळ एका सेंट्रिगच्या दुकानाला दुपारी दीड वाजनच्या सुमारास अचानक आग लागली होती. धुळवडचा सण असल्याने शिवाय या दुकानाचा मालक महंमद सामी हा शुक्रवार मोठी रात्र म्हणजेच जुम्मा रात्र असल्याने सामी हे आपल्या मुंब्रा येथील घरी गेले होते. दुकानाला कुलूप असल्याने शेजारी असणार्‍या नागरिकांनादेखील आगीवर नियंत्रण मिळवणे मुस्किल होऊन बसल्याने नागरिकांनी कर्जत येथील अग्निशमन दलाच्या वाहनाला पाचारण केले. मात्र आग एवढ्या मोठ्या प्रमाणात लागली होती की यात दुकानातील लाकडी सामान, लोखंडी पत्रे,तर दुकानात ठेवलेला चार चाकी पिकअप,आणि दोन चाकी मोटारसायकल जळून खाक झाले आहेत.तर गावकर्‍यांच्या मदतीने अग्निशमन वाहन वेळेत पोहचल्याने काही सिमेंट पत्रे हे सुरक्षित दिसत आहे,मात्र या मध्ये दुकान मालकाचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक हानी झाली आहे.
दुकाना शेजारी असलेल्या मोकळ्या माळरानावर आग लागली होती हीच आग कडाकाच्या उन्हात पसरत दुकाना शेजारी गेल्याने दुकानातील लाकडी समानाने आग पकडल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान या आगीची दाहकता एवढ्या मोठ्या प्रमाणात राज्य मार्गावर आल्याने सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून वाहन चालकाने देखील वाहनांची दिशा बदलत चुकीच्या दिशेने जाणे पसंत केले होते.

Exit mobile version