न्यूयॉर्कमधील अपार्टमेंटमध्ये भीषण आग

19 जणांचा मृत्यू, 63 जखमी
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
न्यूयॉर्कमध्ये एका बहुमजली रहिवासी इमारतीला भीषण आग लागून 19 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये नऊ लहान मुलांचा समावेश असून, डझनहून अधिक जखमी झाले आहेत. रविवारी लागलेली ही आग अमेरिकेत रहिवासी इमारतीत लागलेली आतापर्यंतची सर्वात भीषण आग असल्याचं तेथील अधिकार्‍यांनी सांगितलं आहे. एका हिटरमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.
19 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आमच्याकडे आली असून, अनेकजण गंभीर जखमी आहेत, अशी माहिती मेयर एरिट अ‍ॅडम्स यांनी एका वृत्तवाहिनीला दिली आहे. यावेळी त्यांनी 63 लोक जखमी झाल्याचं सांगितलं.

Exit mobile version