आशा सेविकांच्या मानधनात भरीव वाढ

। मुंबई । वृत्तसंस्था ।

राज्यात सुमारे 81 हजार आशा स्वयंसेविका साडेतीन हजार गटप्रवर्तक कार्यरत आहेत. आशा स्वयंसेविकांचे मानधन 3 हजार 500 वरुन 5 हजार रुपये तर गटप्रवर्तकांचे मानधन 4 हजार 700 वरुन 6 हजार 200 रुपये करण्यात आले आहे. अंगणवाडी सेविकांचे मानधन 8 हजार 325 वरुन 10 हजार रुपये तर मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5 हजार 975 वरुन 7 हजार 200 रुपये करण्यात आले आहे. अंगणवाडी मदतनिसांचे मानधन 4 हजार 425 वरुन 5 हजार 500 रुपये करण्यात आले आहे. तसेच मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची 20 हजार पदे भरणार असल्याचं अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

शक्तीसदन नवीन योजना
शहरी भागात नोकरीसाठी आलेल्या महिलांसाठी केंद्राच्या मदतीने 50 वसतीगृहांची निर्मिती करण्यात येईल. तसेच लैंगिक शोषणापासून मुक्त केलेल्या महिलांसाठी, कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांसाठी ‘स्वाधार’आणि ‘उज्वला’ या दोन योजनांचे एकत्रिकरण करुन केंद्राच्या मदतीने ‘शक्तीसदन’ ही नवीन योजना सुरू करण्यात येईल. या योजनेत पीडित महिलांना आश्रय, विधी सेवा, आरोग्यसेवा, समुपदेशन आदी सेवा पुरवण्यात येईल.

शिक्षणसेवकांना भरघोस मानधन
प्राथमिक व उच्च शिक्षणसेवक 6000 वरुन 16,000 रुपये, माध्यमिक शिक्षण सेवक : 8000 वरुन 18,000 रुपये, उच्च माध्यमिक शिक्षण सेवक : 9000 वरुन 20,000 रुपये, पीएमश्री शाळा : 816 शाळा/ 5 वर्षांत 1534 कोटी रुपये.

Exit mobile version