पॅरा ऑलिंपिकच्या आखाड्यात माणदेशी रत्न

। आटपाडी । वृत्तसंस्था ।

पॅरिस येथे ऑगस्टमध्ये होणार्‍या पॅरा ऑलिंपिकच्या आखाड्यात माणदेशातील आटपाडीच्या मातीत घडलेले सचिन सर्जेराव खिलारी आणि सुकांत इंद्रजित कदम उतरणार आहेत. राज्यातून पॅरा ऑलिंपिकसाठी निवड झालेल्या 12 खेळाडूंत आटपाडीच्या या दोघांचा समावेश आहे. जागतिक क्रमवारीत दोघेही अव्वल स्थानी असल्याने त्यांच्याकडून सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. पदक मिळवण्याचा दोघांनाही विश्‍वास आहे.

करगणीचा सचिन सर्जेराव खिलारी गोळाफेकीत, तर दुसरा कौठुळीचा सुकांत इंद्रजित कदम बॅडमिंटनमध्ये सहभागी होणार आहे. सचिनचा बालपणी अपघात झाल्याने एका हाताला अपंगत्व आले होते. तो गोळाफेकीत सहभागी होणार आहे. काही दिवसांपूर्वी त्याने जागतिक पॅराअ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या ‘शॉटपूट एफ 46’मधून सुवर्णपदक पटकावले आहे. दुसरीकडे सुकांत क्रिकेट खेळताना पडल्याने गंभीर दुखापत झाल्याने गुडघ्यावर शस्त्रक्रिया करावी लागली होती. तो बॅडमिंटन खेळतो. जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असून पुरुष दुहेरीत प्रमोद भगतचा जोडीदार आहे. ही जोडी पॅरामधून जागतिक स्तरावर अव्वल स्थानी आहे. सचिन आणि सुकांत या दोघांच्या पॅरा ऑलिंपिकमधील कामगिरीकडे संपुर्ण देशाचवे लक्ष लागलेले आहे.

Exit mobile version