भेदक गोलंदाजीपुढे फलंदाजांची नांगी
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील विशाखापट्टणम येथे झालेल्या दुसर्या सामन्यात फलंदाजांच्या हाराकिरीमुळे भारताचा लाजिरवाणा पराभव झाला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या भेदक गोलंदाजीने भारताचा डाव केवळ 117 धावांत गुंडाळला आहे. या सामन्यात मिचेल स्टार्कने भारतीय संघाकडून 5 विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात ऑस्टे्रलियाने हे लक्ष्य नाबाद पूर्ण केले.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये ही संघाची सर्वात कमी धावसंख्या आहे. 7 फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले नाहीत. 8व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अक्षर पटेलने सर्वाधिक 29 धावा केल्या. मिचेल स्टार्कने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. दुसरीकडे सीन अॅबॉटने 3 आणि नॅथन एलिसने 2 बळी घेतले. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाज पूर्णपणे गुडघे टेकले होते.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची टॉप ऑर्डर या सामन्यातही अपयशी ठरली. गेल्या सामन्यात भारतीय संघाने 39 धावांत चार विकेट्स आणि नंतर 83 धावांत पाच विकेट्स गमावल्या होत्या. या सामन्यात एकूण 49 धावांवर भारतीय संघाच्या पाच विकेट पडल्या.
हार्दिक पांड्या आणि केएल राहुल 9 धावा करून आऊट झाले. अवघ्या 49 धावांत भारताच्या 5 विकेट पडल्या. यानंतर विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी संघाला सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण नॅथन एलिसने 31 धावांवर एलबीडब्ल्यू कोहलीला झेलबाद करून भारताच्या आशा भंगल्या. यानंतर जडेजानेही 16 धावा केल्या. कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करणारा अक्षर पटेल 29 चेंडूत 29 धावा करून नाबाद राहिला. त्याने 2 षटकारही मारले. प्रत्युत्तरात सलामीवीर टी. हेड नाबाद 41 आणि मिचेल मार्शच्या नाबाद 55 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने हा सामना एकहाती जिंकला.