‘सम्मेद शिखर’चे पावित्र्य राखण्यासाठी जैन साधूने दिली प्राणांची आहुती

। झारखंड । वृत्तसंस्था ।

तीर्थधाम सम्मेद शिखर पर्यटनस्थळ म्हणून केंद्र शासनानं घोषित केलं आहे. या निर्णयाविरोधात अनेक ठिकाणी आंदोलनं होत आहेत. झारखंड राज्य सरकार व केंद्र शासनानं हा निर्णय रद्द करावा, यासाठी सकल जैन समाजाच्या वतीनं आंदोलन केलं जात आहे.

झारखंडमधील गिरीडीह इथं असलेल्या सम्मेद शिखर अर्थात पारसनाथ पर्वतराज हे जैन समाजाचं तीर्थ स्थळ असून आजवर जैन समाजाचे 20 तीर्थंकर हे मोक्षाला गेले आहेत. याच पार्श्वभूमीवर सम्मेद शिखरला पर्यटनाच्या यादीत समावेश केल्याबद्दल समाजात संताप आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात देशभरात निदर्शनं होत आहेत. हे स्थळ पर्यटन स्थळ झाल्यास इथं पर्यटकांकडून नुकसान होण्याची, तसंच धार्मिक भावना दुखावण्याची कृती घडू शकते, अशी भावना या समाज बांधवांकडून व्यक्त केली जात आहे.

सम्मेद शिखर अर्थात पारसनाथ पर्वतराज हे जैन समाजाचं तीर्थस्थळ आहे. इथं आजवर जैन समाजाचे 20 तीर्थंकर हे मोक्षाला गेले आहेत. याच पार्श्वभूमीवर सम्मेद शिखरला पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्याच्या विरोधात उपोषणावर बसलेले जैन साधू सुज्ञयसागर यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगानेर येथील सुज्ञयसागरजी महाराज सम्मेद शिखरला वाचवण्यासाठी 25 दिवसांपासून उपोषणाला बसले होते. मंगळवारी त्यांनी येथील जैन मंदिरात अखेरचा श्वास घेत आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. दुपारी श्रमण संस्कृती संस्थान इथं त्यांना समाधी देण्यात आली.

Exit mobile version