सावधान! कोरोनाच्या ‘या’ प्रकाराचा लसीकरण झालेल्यांनाही धोका

| केरळ | वृत्तसंस्था |
देशात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. कोविडचा सबव्हेरियंट असलेल्या बीए 2.86 च्या जातीतील जेएन 1 चा विषाणू केरळच्या काही भागांमध्ये आढळून आला आहे. त्यामुळे या विषाणूच्या संसर्गाची चिंता निर्माण झाली आहे. तसंच, हा विषाणू वेगाने पसरणारा असल्याचीही माहिती समोर आली आहे.

The India SARS-CoV-2 Genomics Consortium या प्रयोगशाळेने केरळमध्ये हा विषाणू शोधला आहे. INSACOG चे अध्यक्ष एन. के. अरोरा म्हणाले, हा विषाणू नोव्हेंबरमध्ये आढळला होता. हा विषाणू बीए 2.86 चा उपप्रकार आहे. तसंच,जेएन 1 विषाणूचे काही बाधित रुग्णही केरळमध्ये सापडले आहेत.

हा विषाणू वेगाने पसरू नये याकरता उपाययोजना आखण्यात आल्याने आतापर्यंत रुग्णालयात दाखल किंवा गंभीर आजारांची नोंद झाले नसल्याचं या संस्थेने नमूद केलं. तर, जेएन 1 हा विषाणू अमेरिकेत सप्टेंबर 2023 मध्ये पहिल्यांदा आढळला होता.

नॅशनल इंडियन मेडिकल असोसिएशन कोविड टास्क फोर्सचे सह अध्यक्ष राजीव जयदेवन यांनी दिलेल्या माहितीनुसार, सात महिन्यांच्या अंतरानंतर भारतात पुन्हा एकदा करोनाचे रुग्ण वाढत आहेत. केरळमध्ये करोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. परंतु, पूर्वीसारखी तीव्रता आताच्या प्रकरणांमध्ये नाही.

दरम्यान केरळमध्ये आढळून आलेल्या जेएन 1 विषाणू जलद पसरू शकतो आणि यामुळे रोग प्रतिकारशक्तीही कमी होऊ शकते. पूर्वीच्या प्रकारांपेक्षा हा विषाणू वेगळा आहे. पूर्वी करोनाची लागण झालेल्या आणि लसीकरण केलेल्या लोकांनाही या विषाणूची बाधा होऊ शकते, असंही जयदेवन यांनी स्पष्ट केलं.

जेएन 1 विषाणू पाश्चात्य देशांमध्ये वेगाने पसरत आहे. भारतातही आंतरराष्ट्रीय प्रवासी पर्यटन आणि कामाच्या निमित्ताने येत असतात. त्यामुळे हा विषाणू भारतातही वेगना पसरण्याची चिन्हे आहेत, असंही जयदेवन म्हणाल

Exit mobile version