| वावोशी | वार्ताहर |
पत्रकार हा समाजाचा आरसा असून, दैनंदिन जीवनात जगत असताना बदलत्या परिस्थितीतदेखील पत्रकाराने स्वतःची तत्त्वे विकसित करणे व त्या तत्त्वाशी एकनिष्ठ राहणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन खालापूरचे तहसीलदार आयुब तांबोळी यांनी केले आहे. ते पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात आपले विचार व्यक्त करताना बोलत होते.
खालापूर तालुका ग्रामीण पत्रकार संघ व खालापूर तालुका वकील बार असोसिएशन यांच्या वतीने खालापूरमध्ये पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खालापूरचे तहसीलदार आयुब तांबोळी, गटविकास अधिकारी बाळाजी पुरी, वावोशी चे माजी सरपंच वालचंद ओसवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता अजित महानोर, सुजित कालेकर, खालापूर तालुका वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष ड. सिद्धेश जितेकर, खालापूर तालुका वकील बार असोसिएशनचे युवा अध्यक्ष ड. जयवंत पाटील, अॅड. राजदत्त झरकर उपस्थित होते.
दरम्यान, खालापूर तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे खालापूर तालुका अध्यक्ष सुधीर माने, पत्रकार तथा रायगड भूषण रविंद्र जाधव, पत्रकार सुधीर देशमुख, पत्रकार गोपीनाथ सोनावणे, जतिन मोरे, एस.टी.पाटील, अनिल भरतूक, जमालुद्दीन शेख, संतोष गोतरणे, शिवाजी जाधव या पत्रकारांना सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले तसेच रायगड जिल्हा परिषदेतून निवृत्त झालेले रघुनाथ भोसले यांचे देखील तहसीलदार आयुब तांबोळी यांच्या हस्ते गुणवंत कामगार म्हणून सन्मान करण्यात आला.