अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनचा स्तुत्य उपक्रम 

| अलिबाग | प्रतिनिधी |

सामाजिक बांधिलकी जपत रायगड फोटोग्राफर अँड व्हिडीओग्राफर्स असोसिएशनशी संलग्न अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशन आणि अलिबाग-मुरुड मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने वेश्वी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. वेश्वी  ग्रामपंचायतीच्या उपसरपंच आरती पाटील यांच्या हस्ते या शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.

अलिबाग-मुरुड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. उज्वल जैन, डाॅ. सोनाली नाईक, डॉ. अमेय केळकर, डॉ. समीर धाटावकर, डॉ. अनघा भगत,  डॉ. गणेश गवळी,  डाॅ. राजाराम हुलवन,  डाॅ. अश्विनी हुलवान  यांनी विद्यार्थ्यांची कान, नाक, घसा, छाती, पोट, हृदयाचे ठोके, रक्त प्रमाण, दातांची तपासणी करून मोफत औषधं दिली. 

यावेळी रायगड फोटोग्राफर्स अँड व्हिडीओग्राफर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष समीर मालोदे, खजिनदार  जितेंद्र मेहता, शाळेचे मुख्याध्यापिका अश्विनी लांगी, वेश्वीचे माजी सरपंच प्रफुल पाटील, ग्रामपंचायत सदस्य अनंत मुळूस्कर, जुई शेळके, रुपाली गुरव, अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष तुषार थळे, कार्याध्यक्ष सुदेश माळी, सहकार्याध्यक्ष सुबोध घरत, उपाध्यक्ष राकेश दर्पे, सचिव विकास पाटील, खजिनदार विवेक पाटील, सहखजिनदार प्रणेश पाटील, सल्लागार सुरेश खडपे, सचिन आसरानी, शाळेतील शिक्षक निर्मला शिरसाठ, नरेश गायकवाड, रवींद्र साळुंखे व विद्यार्थी उपस्थित होते. 

अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशन गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक बांधिलकी ठेवून काम करीत आहे. या संस्थेमार्फत शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य विषयक उपक्रम राबविले जातात. त्याचा फायदा ग्रामीण भागातील सर्वच स्तरातील घटकाला चांगल्या पध्दतीने होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनच्यावतीने वेश्वी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी  शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात एकूण ६३ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. 

Exit mobile version