शेतकऱ्यांचा शेताच्या बांधावर सन्मान

रायगड प्रेस क्लबचा स्तुत्य उपक्रम

| तळा | वार्ताहर |

जगाचा पोशिंदा शेतकरी शेती व्यवसायापासून दूर जात असताना त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी रायगड जिल्हा प्रेसचे माजी अध्यक्ष स्व. संतोष पवार यांच्या संकल्पनेतून रायगड प्रेस क्लबच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रगत आणि शेतीनिष्ठ शेतकऱ्यांचा सन्मान त्यांच्याच शेताच्या बांधावर जाऊन दरवर्षी केला जातो. तळा शाखेच्या वतीने आदर्श शेतकरी पुरस्कार जनार्दन भौड (रा. पढवण) आणि नथुराम कोदेरे (रा. चरई गौळवाडी) यांना पढवण येथे शेताच्या बांधावर पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी या सन्मान सोहळ्यास तळा तहसीलदार स्वाती पाटील, तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे, उपविभागीय कृषी तंत्र अधिकारी रविशंकर कावळे, तळा प्रेस क्लब अध्यक्ष संजय रिकामे, उपाध्यक्ष किशोर पितळे, सचिव आंबेगावे, नझिर पठाण, पुरूषोत्तम मुळे, पुरस्कार मानकरी जनार्दन भौड, नथुराम कोदेरे, परशुराम कदम, अनिल माटल, दिनेश गायकर, विठ्ठल सुतार, तलाठी गवई पढवण ग्रामस्थ महिला मंडळ मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तळा प्रेस क्लबचे मार्गदर्शक पुरुषोत्तम मुळे यांनी केले. प्रास्ताविक पत्रकार किशोर पितळे यांनी केले, तर आभार संजय रिकामे यांनी मानले.

Exit mobile version