महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान

| रसायनी | वार्ताहर |

रसायनीतील वडगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील वाशिवली येथील डॉ. पारनेरकर महाराज कनिष्ठ आणि महाविद्यालय येथे संवेदना डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या वतीने नुकतेच अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी किशोरावस्था आणि व्यसनाधीनता या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. या व्याख्यानाला 68 विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

संवेदना डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या मोहिनी बागडे यांनी मुलांना वयात येताना होणार्‍या शारीरिक, मानसिक बदलांविषयी सोप्या भाषेत महत्त्वाची माहिती दिली. त्यानंतर आजकाल तरुण पिढीमध्ये वाढत चाललेल्या व्यसनांसंबंधित चर्चा केली. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ हे आपल्या आरोग्यासाठी किती घातक आहेत आणि ते आपल्या आरोग्यावर किती वाईट परिणाम करत असल्याची माहिती दिली. दरम्यान, आपण स्वतःला व्यसनांपासून कसे दूर ठेवू शकतो, याबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला विद्यार्थी वर्गाचा उत्तम प्रतिसाद मिळाला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पारनेरकर महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य एकनाथ सोनावणे आणि प्राध्यापक डॉ. अनिल पाटील आणि इतर शिक्षकांचे मोलाचे सहकार्य मिळाले.

Exit mobile version