14 मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

| आगरदांडा | प्रतिनिधी |

जुनी पेन्शन सुरू करावी या प्रमुख मागण्यांसह असंख्य प्रलंबित मागण्यांसाठी शासकीय कर्मचारी 14 मार्चपासून संपावर जात आहेत. मुरुड तालुक्यातील विविध 18 विभागांतील चार हजार कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत. या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीचे मुरुड अध्यक्ष रिमा कदम यांनी दिली.

मुरुड पंचायत समितीमधील कै. नानासाहेब धर्माधिकारी सभागृहात 14 मार्च रोजीच्या संपाबाबत नियोजन करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संतोष पवार, राजेश थळकर, परशुराम म्हात्रे, प्रवीण ठाकूर, रिमा कदम, राकेश पाटील, विजय म्हापुस्कर, वानखेडे, राज्य सरकारी कर्मचारी, निम सरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, नगरपालिका नगरपरिषद कर्मचारी, जिल्हा महसूल कर्मचारी, तलाठी संघ, जिल्हा आरोग्य कर्मचारी संघटना, राज्य चतुर्थ श्रेणी कर्मचारी आदी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Exit mobile version