सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

| महाड | प्रतिनिधी |
महाड तालुक्यातील इसाने कांबळे या गावात राहात असलेली रुकसाना फराहान येलुकर हिने गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातील बेडरूममध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. रुकसानाने गळफास लावून आत्महत्या केली नसून, तिचा घातपात करण्यात आला असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सासू-सासरा आणि पती यांच्याविरोधात महाड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करण्यात आली आहे. पोलिसांनी तिघांच्या विरोधात दाखल केला असून, मृत विवाहितेच्या सासर्‍याला चौकशीकरिता ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलादपूर तालुक्यातील वावे या गावामध्ये राहणारी रुकसाना तिचे लग्न महाड तालुक्यातील ईसाने कांबळे येथील फरहान मुस्ताक येलुकर याच्याबरोबर 2019 मध्ये झाले. रुकसाना लग्न झाल्यानंतर आपल्या सासरी आली. सुरुवातीचे काही दिवस सुखासमाधानाने गेले. नवीन घरामध्ये आल्यानंतर रुकसाना आपल्या भविष्याची पाहात होती. थोड्याच दिवसांनी तिला घरामध्ये अपमानास्पद वागणूक देण्यास सुरुवात झाली. तिचा मानसिक, शारीरिक छळ केला जाऊ लागला. रुकसानाचे लग्न होऊन एक वर्षाचा काळ गेला; परंतु तिला मूलबाळ होत नसल्याचे कारण पुढे करून पती फरहान मुश्ताक येलुकर, सासरा मुश्ताक येलुकर, सासु फैरोजा येलूकर या तिघांनी घरामध्ये तिचे जगणे अशक्य टाकले होते. रुकसाना तिच्यावर होणार्‍या अत्याचाराला सामोरे जात दिवस काढीत होती. आपल्याला सासरच्या मंडळींकडून शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याचे तिने वडील अब्दुल रहमान दाऊद करबेलकर यांना सांगितले होते. वारंवार होणार्‍या मानसिक आणि शारीरिक अत्याचाराला कंटाळून रूकसानाने अखेर 2 मार्च, गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास घरातील बेडरूममध्ये गळफास लावून आत्महत्या.

या घटनेची माहिती पोलिसांना समजतात पोलिस घटनास्थळाला भेट देऊन चौकशीला सुरुवात केली. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर रुकसानाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असल्याचे समजले. रुकसानाचे वडील करबेलकर यांनी तिच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला व आपल्या मुलीने गळफास लावून आत्महत्या केली नसून तिचा घातपात करण्यात आला असल्याचा संशय व्यक्त केला, तसेच रुकसानाच्या तिचा सासरा, सासू आणि पती जबाबदार असल्याची तक्रार पोलिसांकडे केली. पोलिसांनी रुकसानाचे वडील अब्दुल रहमान करबेलकर यांनी केलेल्या तक्रारीवरून सासू, सासरा आणि पती यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. महाडचे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे पुढील तपास करीत आहेत.

Exit mobile version