| पनवेल | वार्ताहर |
पनवेलजवळील जेएनपीटी टी पॉईंटजवळ सोमवारी दुपारी एका मारुती गाडीला अचानकपणे लागलेल्या आगीत संपूर्ण गाडी जळून खाक झाली असून, सुदैवाने गाडीतील प्रवासी बचावले आहेत.
पुणे बाजूकडून मुंबईकडे युसूफ जबलपूरवाला हे त्यांच्या ताब्यातील मारुती गाडी क्र.एमएच-14-सीए-0157 ही घेऊन चालले होते. पनवेलजवळील पळस्पे जेएनपीटी टी पॉईंटजवळ अचानकपणे गाडीच्या बोनेटमधून धूर येऊ लागल्याने त्यांनी गाडी बाजूला उभी करून ते गाडीच्या बाहेर पडले. त्यानंतर गाडीने पेट घेण्यास सुरूवात केली. या घटनेची माहिती मिळताच नवीन पनवेल अग्नीशमन दलाचा बंब तसेच पनवेल वाहतूक पोलीस व पनवेल शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना होऊन ही आग आटोक्यात आणली आहे.