| उरण | वार्ताहर |
लायन्स क्लब ऑफ उलवे जेम्स, लायन्स क्लब ऑफ नवी मुंबई आगरी कोळीवाव लायन्स क्लब ऑफ द्रोणागिरी या तीनही क्लबच्या पदग्रहण सोहळ्याचा भव्य दिव्य समारंभ गोरक्षनाथ मंदिर येथे संपन्न झाला.
गतवर्षीचे अध्यक्ष एम जे एफ लायन मिलिंद पाटील, लायन श्रीकांत पाटील व लायन संदीप म्हात्रे यांनी आयोजित केलेल्या पदग्रण सोहळत . यावर्षीचे लायन्स क्लब ऑफ उलवे जेम्सच्या नवनियुक्त अध्यक्ष लायन गौरी देशपांडे, लायन्स क्लब ऑफ नवी मुंबई आगरी कोळी चे नवनियुक्त अध्यक्ष लायन महेंद्र सुतार व लायन्स क्लब ऑफ द्रोनागिरीचे नवनियुक्त अध्यक्ष लायन संदीप म्हात्रे यांचे लिओ क्लब ऑफ द्रोनागिरीच्या कलाकारांनी ढोल ताशाच्या गजरात धुमधडाक्यात स्वागत केले.
तीनही अध्यक्षांचे सभामंडपात आगमन होताच श्री गणेशा नृत्य सादर झाले पदग्रहण सोहळ्याचे इंडक्शन ऑफिसर पी एम जे एफ लायन एन आर परमेश्वरन, प्रमुख पाहुणे व इन्स्टॉलेशन ऑफिसर पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर पी एम जे एफ लायन अनिल जाधव यांची उपस्थिती लाभली . प्रमुख अतिथी लायन राजेंद्र पाटील अध्यक्ष एपीएमसी मुंबई महाराष्ट्र व झोन चेअरपर्सन ला रमाकांत म्हात्रे यांचीही उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे अध्यक्ष लायन मिलिंद पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावना केली . एम जे एफ लायन विजय पाटील यांनी नवी मुंबई आगरी कोळी क्लबच्या वतीने आपले मनोगत व्यक्त केले . लायन संदीप म्हात्रे यांनी लायन्स क्लब ऑफ द्रोणागिरीच्या वतीने आपले मनोगत व्यक्त केले. तीनही क्लबच्या वतीने रायगड मधील सहा अंगणवाडींना शैक्षणिक खेळणी व साहित्य देऊन संयुक्तपणे स्तुत्य उपक्रम करण्यात आला. नवनिर्वाचित अध्यक्ष ला गौरी देशपांडे यांनी आपल्या पदस्वीकृती अध्यक्षीय भाषणात नाविन्यपूर्ण समाज उपयोगी उपक्रम करणार असल्याचे जाहीर केले . तसेच दोन्ही क्लबच्या अध्यक्षांनी सुद्धा त्यांच्या पुढील उपकर्माबद्दल माहिती दिली . सदर कार्यक्रमास लायन्स इंटरनॅशनल च्या अनेक दिगग्ज पदाधिकाऱयांची वर्णी लागली. लायन्स क्लब ऑफ द्रोणागिरी चे अध्यक्ष संदीप म्हात्रे यांनी सर्वाना शुभेच्छा दिल्या व आभार प्रदर्शन केले.