दिल्लीतील बेबी केअर सेंटरमध्ये भीषण आग; सात नवजात बाळांचा मृत्यू, तर पाच व्हेंटिलेटरवर

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

दिल्लीच्या एका बेबी केअर सेंटरमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत 7 बाळांचा मृत्यू झाला आहे, तर 5 जण गंभीर आहेत. ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समझले नाही.

राजधानी दिल्लीच्या विवेक विहारच्या ब्लॉक बी, आयटीआयजवळील बेबी केअर सेंटरमध्ये शनिवारी (दि. 25) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेत 7 नवजात बाळांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आग लागल्याची बातमी मिळताच तात्काळ 9 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी बेबी केअर रुग्णालयातील बाळांना सुखरुप बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाच्या जवानांनी 12 बाळांना बाहेर काढले. मात्र, उपचारादरम्यान त्यापैकी 7 जणांचा मृत्यू झाला, तर 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. ही आग कशामुळे लागली याचे कारण सध्या माहित नाही. या बेबी केअर सेंटरच्या बाजुच्या इमारतीतही आग लागली, पण सुदैवाने तिथे कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

Exit mobile version