| नवीन पनवेल | वार्ताहर |
ड्रोन सर्व्हेबाबत पनवेलची जनता अनभिज्ञ आणि संभ्रमात असल्यामुळे लोकांमध्ये या सर्व्हेबाबत कोणतीही माहिती नाही. हा होणारा सर्वे नागरिकांसाठी हितकारक आहे की नुकसानीचा, हेदेखील स्पष्ट होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याबाबत पुढील आठवड्यात बैठक घेण्यात येईल, असे आश्वास प्रांताधिकारी राहुल मुंडके यांनी दिले. शासनाच्या वतीने कोणतीही बैठक न घेता हे सर्व्हे सुरू आहेत. त्यामुळे बर्याच ठिकाणी, बर्याच गावांमध्ये या सर्व्हेला विरोध झालेला आहे. यासाठी शेकाप तालुका चिटणीस राजेश केणी, क्रांतिकारी सेवा संघाचे अध्यक्ष नामदेव फडके, सामाजिक कार्यकर्ते शेखर शेळके, पंचायत समिती सदस्य स्वप्नील भुजंग, सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील आदी मान्यवरानी प्रांत यांची भेट घेऊन चर्चा केली.
प्रांत ऑफिसमध्ये प्रांताधिकारी पनवेल राहुल मुंडके यांच्यासोबत बैठक झाली. ड्रोन सर्व्हेबाबत एक बैठक घेऊन आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आजी-माजी सरपंच, सदस्य यांची लवकरच बैठक लावून यांच्यासमक्ष ड्रोन सर्व्हेबाबत माहिती देण्याचे प्रांत यांनी मान्य केले आहे. पुढील आठवडाभरात ही बैठक होणार आहे. यावेळी पनवेलमधील विविध विषयांवरदेखील चर्चा करण्यात आली.
ड्रोन सर्व्हेच्या माहितीसाठी आठवडाभरात बैठक घेणार; प्रांताधिकार्यांचे आश्वासन
