| पनवेल | वार्ताहर |
तळोजा फेज-1 येथे राहणारी 15 वर्षीय मुलगी गेल्या जानेवारी महिन्यात बेपत्ता झाली असून, अद्याप तिचा शोध लागला नाही. तळोजा पोलिसांनी बेपत्ता मुलीचा सीसीटीव्हीच्या मदतीने शोध घेतला, मात्र अद्याप ती सापडलेली नाही. ही मुलगी तळोजा फेज 1, सेक्टर – 10 मध्ये तिच्या कुटुंबासह राहत होती. 24 जानेवारी 2025 रोजी दुपारी 4.50 वाजता ती घरात कोणाला काही एक न सांगता रागावून घरातून निघून गेली. अद्याप ती कुठेच सापडली नाही. तिची उंची 5 फूट, रंग गोरा, सडपातळ बांधा असे तिचे वर्णन असून, तिने अंगात पांढर्या रंगाचा कुर्ता, पांढर्या रंगाचा पायजमा परिधान केली आहे. अशा वर्णनाची मुलगी कोणाला दिसल्यास त्यांनी तळोजा पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे







