। बीड । प्रतिनिधी ।
बीडच्या दिंद्रुडमध्ये चॉकलेटचे आमिष दाखवून 70 वर्षीय व्यक्तीने 9 वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धारूर तालुक्यातील एका गावात शेतमजूर कुटुंब राहत होते त्याची इयत्ता चौथी शिकणारी नऊ वर्षाची मुलगी 28 जानेवारी रोजी सकाळी शाळेत जाताना मैत्रिणीला भेटण्यासाठी गेली. रस्त्यातच आरोपी बाबुराव केरबा निरडे याने तिला चॉकलेट देतो म्हणून घरात बोलावून घेत तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर ती मुलगी शाळेतही गेली. मात्र, घरी आल्यापासून ती शांत राहत असल्याने आईने तिला विश्वासात घेऊन विचारले असता तिने सर्व माहिती आईला सांगितली.याप्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून बाबुराव केरबा निरडे याच्याविरुद्ध दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर अंबाजोगाई येथून आरोपीस जेल बंद करत त्याला न्यायालयात हजर केले असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.







