। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
परिक्षेला जाते सांगून घराबाहेर पडलेली खंडाळा येथील बारावीला असलेली अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे.
खंडाळा येथील फियार्दी यांची पिडीत मुलगी वय-17 वर्षे ही जा.र.ह.कन्या शाळा अलिबाग येथे बारावीच्या वर्गात शिकत होती. दि.13 मार्च रोजी दुपारी 01.30 वाजण्याच्या सुमारास पेपरला जाते असे सांगुन सदर मुलगी घरातुन निघुन गेली होती. पेपर झाल्यानंतर देखील उशिरापर्यंत ती घरी परत आलीच नाही. त्यामुळे तिचा सर्वत्र शोध घेतला असता ती कोठेही मिळुन आली नाही. त्यामुळे तिला कोणीतरी अज्ञात इसमाने तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेवून तिला पळवून नेल्याची तक्रार तिच्या पालकांनी अलिबाग पोलिस ठाण्यात केली आहे. त्यानुसार अलिबाग पोलीस ठाणे येथे भा.दं.वि.क,363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास महिला पोलिस हवालदार जोत्स्ना मासे हे करीत आहेत.