मनसेच्या पदाधिकार्‍याला जबर मारहाण

| पनवेल | वार्ताहर |

मनसेचे पनवेल उपशहर अध्यक्ष मनोज कोठारी यांना बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या मारहाणीत मनोज कोठारी जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कामोठे पोलिसांनी या प्रकरणात मिलिंद खाडे व त्याच्या तीन सहकार्‍यांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

मनोज कोठारी हे कामोठे परिसरात राहण्यास आहे. त्यांना तीन महिन्यांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेल उपशहर अध्यक्षपद मिळाले आहे. पहाटे ते मित्रांसह बी.के. धाबा येथे गाडीने गेले होते. त्या ठिकाणी मिलिंद हा मित्रांसह उभा होता. यावेळी त्यांनी कोठारी यांच्याकडे विचारपूस केल्यावर मिलिंद हा त्यांच्या अंगावर धावून गेला. यावेळी कोठारींचा मित्र प्रशांत धनावडे याने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता, मिलिंद खाडे व त्याच्या तीन मित्रांनी गाडीमधील हॉकीस्टिक काढून कोठारी व प्रशांत यांना मारहाण केली.

Exit mobile version