फौजदारवाडी शाळेमध्ये फिरते संग्रहालय

धैर्य सामाजिक संस्थेचा उपक्रम

| पोलादपूर | प्रतिनिधी |

पोलादपूर तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा मोरगिरी फौजदारवाडी या शाळेत धैर्य सामाजिक संस्थेच्या फिरते संग्रहालय या उपक्रमाअंतर्गत ऐतिहासिक शिवकालीन शस्त्र तसेच विविध देशांतील नाणी व नोटा या संग्रहाचे प्रदर्शन भरविण्यात आले. या उपक्रमासाठी धैर्य सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ओंकार उतेकर, ज्ञानोबा रेणोसे, राजा पाटील, संदेश पालकर, सर्व विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. मुख्याध्यापक ज्ञानोबा रेणोसे यांनी विद्यार्थ्यांना संस्थेच्या सामाजिक कार्याबाबत माहिती दिली तसेच संस्थेचे सर्व विद्यार्थी आणि शाळा व्यवस्थापन समिती तर्फे आभार व्यक्त केले.

अध्यक्ष ओंकार उतेकर यांनी विद्यार्थ्यांचे या संग्रहालय उपक्रमातील वस्तूंची माहिती दिली. तसेच शिवकालीन युध्द कलेचे प्रात्यक्षिक देखील करून दाखविले. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पाडण्यासाठी हा आणखी एक स्तुत्य उपक्रम पोलादपूर तालुक्यात सुरू केल्याबद्दल ग्रामस्थांनी संस्थेचे आभार मानले.

Exit mobile version