तहसीलदार कार्यालयाची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यात बुधवार दि. 20 एप्रिल रोजी कोरोनाच्या एका नवीन रुग्णाची नोंद झाली आहे. बुधवारी तालुक्यात दोन विद्यमान रूग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत अलिबाग तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 23 हजार 242 झाली आहे. यापैकी 629 रुग्णांचा मृत्यू झाला. तर 22 हजार 611 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील दोन पॉझिटीव्ह रुग्णावर उपचार सुरु असल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.







