| माणगाव | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता, नवोपक्रम आणि स्टार्टअप संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी माणगावचे डी.जी. तटकरे महाविद्यालय आणि वायफाय फाऊंडेशन इन्क्युबेशन एनपीओ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे महाविद्यालयात उद्योजकता, नवोपक्रम आणि स्टार्टअप उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यात येणार असून, उद्योग-अकादमिक सहकार्याला नवी दिशा मिळणार आहे.
स्वर्गीय आमदार अशोक साबळे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे या उद्देशाने संस्थेची स्थापना केली. संस्थेचे अध्यक्ष मा. ॲड. राजीव साबळे यांच्या नेतृत्वाखाली संस्था शिक्षण, संशोधन, नवोपक्रम आणि विद्यार्थी विकासासाठी विविध उपक्रम राबवत आहे. सामंजस्य कराराअंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थी, माजी विद्यार्थी, संशोधक तसेच रायगड जिल्ह्यातील इतर महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना स्टार्टअप इन्क्युबेशन, उद्योजकता विकास, उद्योग तज्ज्ञांचे मार्गदर्शन, कौशल्य विकास, करिअर मार्गदर्शन, इंटर्नशिप, बौद्धिक संपदा हक्क व पेटंट सहाय्य, कंपनी नोंदणी, व्यवसाय आराखडा तयार करणे, गुंतवणूकदार जोडणी, निधी उभारणी आणि शासकीय योजनांविषयी मार्गदर्शन अशा विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
रायगडमध्ये उद्योजकतेचे नवे पर्व
