माथेरानच्या घाटात धावली नवी मिनीबस

विविध चाचण्यांनंतर सेवेत होणार दाखल
| माथेरान | वार्ताहर |
रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना डी.पी.सी मधून एक नवीन बस खरेदी करण्यास सांगितले होते. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवार, दि. 6 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता नेरळ-माथेरानसाठी अशोक लेलँड कंपनीची 35 सीटर बस पूर्ण सीट घेऊन नेरळ-माथेरान घाटात या बसची चाचणी घेण्यात आली.

यापूर्वीची टाटा कंपनीची जी मिनीबस नेरळ-माथेरान घाटात सुरू होती. त्या बसची नव्याने निर्मिती बंद झाल्यामुळे त्याला पर्यायी कोणती मिनीबस उपयुक्त होईल या सर्व गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी अशोक लेलँड कंपनीच्या बसची या घाटरस्त्यात चाचणी घेण्यात आली. ही बस घाटात कशी चालते, इंजिन त्या क्षमतेचे आहे का? या सर्व गोष्टींचा यावेळी अभ्यास करण्यात आला. यावेळी मेकॅनिक इंजिनियर ऑपरेशन पेणचे पंकज धावरे मोहिते, मेकॅनिक इंजिनियर कुर्ला, अशोक लेलँडचे इंजिनियर व अधिकारी, मनोज खेडकर, संदीप शिंदे, प्रकाश सुतार, भास्कर शिंदे. निखिल शिंदे, शुभम गायकवाड, विजय मोरे, स्वप्नील गोसावी, आदेश घाग उपस्थित होते.

आजचा या बसचा चाचणी अहवाल मुंबई ऑफिसला देण्यात येईल, त्यानंतर बसबाबतचा अंतिम निर्णय होऊन नेरळ-माथेरान नवीन बस धावू शकेल. सदर बसची लांबी जास्त आहे, त्यामुळे अवघड वळणावर त्रास होऊ शकतो. त्यासाठी किमान तीस सीट्सची मिडीबस या मार्गावर उत्तम प्रकारे धावू शकते, असा विश्वास उपस्थित नागरिकांनी व्यक्त केला आहे.

Exit mobile version