। मुंबई । वृत्तसंस्था ।
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्यात जगभरात जवळपास २.१ कोटी व्यक्तींना कोरोना संक्रमण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे जगावर तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे आता आणखी एक चिंता वाढवणारी बाब समोर आली आहे वेगाने संक्रमित होणारा ओमिक्रॉन हा कोरोनाचा शेवटचा व्हेरिएंट नसल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे येणाऱ्या काळात आणखी नवी रुप उघडकीस येऊ शकतं.
कोरोना व्हायरसचा पुढचा व्हेरिएंट ओमिक्रॉनपेक्षा जास्त घातक असेल असे WHOच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.