मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये आंशिक नेफ्रेक्टॉमी; रुग्णाचे मूत्रपिंड वाचविण्यात डॉक्टरांना यश
| नवी मुंबई | प्रतिनिधी |
यूरोलॉजिस्ट डॉ. विकास भिसे यांच्या नेतृत्वाखालील टीमने मूत्रपिंडाच्या कर्करोगाचे निदान झालेल्या 35 वर्षीय रुग्णावर यशस्वीरित्या उपचार केले. आंशिक नेफ्रेक्टॉमी अशा किमान आक्रमक तंत्राचा वापर करून, उर्वरित मूत्रपिंडाचे जतन करत ट्यूमर काढून टाकण्यात आले, ज्यामुळे रुग्णाला जगण्याची दुसरी संधी मिळाली.
नवी मुंबईचे रहिवासी असलेले व वाहन चालक म्हणून कार्यरत असलेल्या 35 वर्षीय रुग्ण संजय जैस्वार यांना काही दिवसांपासून मूत्रावाटे रक्तस्रावाची समस्या आढळून आली. सुरुवातीला रुग्णाने त्याकडे दुर्लक्ष केले. पण जेव्हा हे तीन ते चार दिवस सतत त्यांना ही समस्या आढळून आली तेव्हा मात्र त्यांनी डॉक्टरांकडे धाव घेतली. त्यानंतर सखोल तपासणीअंती रुग्णाला कर्करोगाचे निदान झाले. त्यांच्या सुरुवातीच्या तपासानंतर त्यांना डॉ. विकास भिसे यांच्याकडे पाठवण्यात आले, ज्यांनी या स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी ताबडतोब सीटी युरोग्राफी करण्याचे आदेश दिले. स्कॅनमध्ये त्यांच्या डाव्या मूत्रपिंडात 2.72.52 सेमी आकाराचा ट्यूमर आढळला. ट्यूमरचे स्थान आणि आकार लक्षात घेता, सर्वोत्तम उपाय म्हणजे आंशिक नेफ्रेक्टॉमी, ही एक अशी शस्त्रक्रिया आहे जी मूत्रपिंडाचा फक्त ट्यूमरने प्रभावित असलेला भाग काढून टाकते, ज्यामुळे निरोगी ऊतींना हानी पोहोचत नाही आणि मूत्रपिंडाचे कार्य सुरळीत राखता येते.
डॉ. विकास भिसे (यूरोलॉजिस्ट) सांगतात की, सुरुवातील रुग्णालयात दाखल झाल्यावर रुग्णाने मूत्रावाटे रक्तस्रावाची तक्रार केली. अल्ट्रासाऊंड आणि सीटी स्कॅन सारख्या तपासण्या केल्यानंतर रेनल सेल कार्सिनोमा म्हणजे मूत्रपिंडाचा कर्करोगाचे निदान झाले. 26 जून रोजी रुग्णावर पार्शियल नेफ्रेक्टॉमीशस्त्रक्रिया करण्यात आली. पार्शियल नेफ्रेक्टॉमी म्हणजे मूत्रपिंडाचा काही भाग काढून टाकण्याची शस्त्रक्रिया. या शस्त्रक्रियेमध्ये, फक्त बाधित भाग, ट्युमर काढला जातो, ज्यामुळे मूत्रपिंडाचे कार्य शक्य तितके चांगले टिकून राहते व निरोगी ऊतींना हानी पोहोचत नाही. प्रगत लॅप्रोस्कोपिक तंत्रांचा वापर करून ट्यूमर अचूकपणे काढून टाकण्यास यश येते. या प्रक्रियेनंतर रुग्णाला अवघ्या दोन दिवसांत घरी सोडण्यात आले. ही शस्त्रक्रिया सुमारे 2 तास चालली आणि 2 दिवसांनी रुग्णाला घरी सोडण्यात आले. योग्य वेळी उपचार न केल्यास कर्करोग वाढणे आणि शरीराच्या इतर भागांमध्ये पसरणे यासारख्या गुंतागुंत निर्माण होऊ शकतात.
डॉ. भिसे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मी आभार मानतो आहे. त्यांनी मला जगण्याची दुसरी संधी दिली असून, मी त्यांचा कायम ऋणी राहीन, असे रुग्ण संजय जैस्वार यांनी स्पष्ट केले.





